Ad will apear here
Next
‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’
पुणे : ​‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे,’ असे मत ‘एमकेसीएल’च्या ई-प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक सचिन सातपुते यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर ​सचिन सातपुते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ​या विषयावर बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात ​नुकत्याच रंगलेल्या या कट्ट्यावर निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर, ‘मविप’चे संजय मालती कमलाकर यांच्यासह विज्ञानप्रेमी सहभागी झाले होते.

सचिन सातपुतेसातपुते म्हणाले, ​‘तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरली जाणारी बुद्धिमत्ता ही ​कृत्रिम बुद्धिमत्ता आहे​. आज मोबाईल, इंटरनेट, गुगल, अनुवाद, नकाशे, रोबोट आणि अशा अनेक गोष्टीत ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते. ​आपण वापरत असलेल्या प्रत्येक उपकरणाद्वारे आणि अॅप्लिकेशनद्वारे आपली माहिती साठवली जाते. त्याआधारे ही बुद्धिमत्ता काम करते. शेती कामासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी, शिक्षण आणि आरोग्यासह इतर अनेक क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणे या बुद्धिमत्तेच्या जोरावर निर्मिली जात आहेत.’

‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असल्याने मानवाच्या रोजगारावर परिणाम होईल, अशी भीती अनेकांना वाटते; परंतु यामुळे काही नोकऱ्या कमी होतील, तर दुसरीकडे यातून रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही वापर वाढला, तरी मानवाच्या बुद्धिमत्तेचे महत्त्व कायम राहणार आहे. गरिबी हटवण्यासाठी, सर्वांच्या शिक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला वापर करून घेणे आपल्यावर आहे. तसे झाल्यास भविष्यात मानवाच्या जगण्याचा कालावधी निश्चित वाढणार आहे,’ असेही सातपुते यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZKUBM
Similar Posts
वैज्ञानिक कट्ट्यावर सचिन सातपुते पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर एमकेसीएलच्या ई-प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक सचिन सातपुते येणार आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा त्यांच्या गप्पांचा विषय असणार आहे
‘कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे’ पुणे : आपण जसे क्षमतेपलीकडे काम करू शकत नाही, तसेच निसर्गाचेही आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता पुढ्च्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा.
‘रासायनिक अभियांत्रिकीमुळे दैनंदिन जीवन सुकर’ पुणे : ‘आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यामध्ये रासायनिक अभियांत्रिकीचा मोठा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रात तात्काळ आराम देणाऱ्या वेदनारहित औषधांमध्येही प्रभावी रसायने वापरली जातात. त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सुकर होत आहे,’ असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ
‘सजीवांच्या अभ्यासात जैवमाहितीशास्त्र महत्त्वपूर्ण’ पुणे : ‘सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती भरलेली आहे. स्थायी, द्रव स्वरूपात शरीराची रचना असून, त्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन आहे. विविध पेशी, बॅक्टेरिया आणि जैविक घटक शरीरामध्ये आहेत. सजीवांच्या या अभ्यासासाठी जैवमाहितीशास्त्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language